महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून तब्बल २ हजार २२५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लघंन

पाकिस्तानने या वर्षीच्या पहिल्या ९ महिन्यांमध्ये जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे सर्वांत जास्त उल्लघंन केले आहे.

पाकिस्ताकडून तब्बल २ हजार २२५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लघंन

By

Published : Oct 4, 2019, 6:37 PM IST

नवी दिल्ली -पाकिस्तानने या वर्षीच्या पहिल्या ९ महिन्यांमध्ये जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे सर्वांत जास्त उल्लघंन केले आहे. या वर्षीच्या २ ऑक्टोबरपर्यंत २ हजार २२५ वेळा म्हणजेच एका दिवसांमध्ये आठवेळा नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे.


२०१८ मध्ये पाकिस्तानने १ हजार ६२९ वेळा नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला होता. तर, लष्कराने २०१८ मध्ये २५४ तर २०१७ मध्ये २१३ आणि या वर्षीच्या २ ऑक्टोबरपर्यंत तब्बल १४० दहशतवाद्यांना मारले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


पाकिस्तानमध्ये भारतीय हवाई दलाने बालाकोट एअर स्ट्राईक केली होती. त्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार नियत्रंन रेषेचे उल्लंघन करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर यामध्ये वाढ झाली. मात्र, त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला भारताने जशास तसे उत्तर दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details