नवी दिल्ली -भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. भारत कोरोनाग्रस्तांच्या कमी चाचण्या घेत आहे, अशीही चर्चा सुरू आहे. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने भारतातील कोरोना चाचणीची माहिती दिली आहे. भारतात एका कोरोनाग्रस्तामागे 24 व्यक्तींची चाचणी घेण्यात येत आहे, त्यामुळे आपण कमी चाचण्या घेत आहोत, असे म्हणू शकत नाही, असे आयसीएमआरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
'आपण कमी चाचण्या घेत आहोत, असे म्हणू शकत नाही' - कोरोना अपडेट
एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामागे जपान 11.7, इटली 6.7, अमेरिका 5.3, इंग्लड 3.4 व्यक्तींची चाचणी घेत आहे.
एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामागे जपान 11.7, इटली 6.7, अमेरिका 5.3, इंग्लड 3.4 व्यक्तींची चाचणी घेत आहे. रॅपिड टेस्टिंग किट चाचणी कोरोनाचे निदान करण्यासाठी नाही तर प्राथमिक निगराणी करण्यासाठी वापरण्यात येत आहे, विशेषत: संवेदनशील भागांमध्ये, असे आयसीएमआरने सांगितले.
रेल्वे विभागाने आत्तापर्यंत 10 हजार 500 आयसोलेशन बेड तयार ठेवले आहेत. तर देशातील 325 देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले नाहीत. भारताला रॅपिड टेस्टिंग चाचणीचे 5 लाख किट मिळाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली.