नवी दिल्ली - लोकसभेनंतर आज (बुधवार) राज्यसभेमध्येदेखील नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) पारित झाले. त्यानंतर नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबत आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेल्या खासदारांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.
आपल्या देशासाठी हा एक अविस्मरणयीय दिवस आहे. राज्यसभेमध्ये विधेयक मंजूर झाल्याचा मला आनंद आहे. या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेल्या सर्व खासदारांचे आभार. गेली कित्येक वर्षे छळ सहन करणाऱ्या अनेक लोकांचे दुःख हे विधेयक दूर करेल, अशा आशयाचे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.
तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील ट्विट करत म्हटले आहे, की आज हे विधेयक पारित झाल्यामुळे कोट्यवधी वंचित आणि पीडित लोकांची स्वप्ने प्रत्यक्षात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बाधित लोकांच्या सन्मान आणि सुरक्षिततेचा संकल्प केल्याबद्दल त्यांचे आभार.
भारताच्या सार्वभौमत्वावर धर्मांध शक्तींचा विजय..