महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#CAA Protest LIVE : उत्तरप्रदेशात हिंसक आंदोलनामध्ये 15 जणांचा मृत्यू

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरामध्ये हिंसक आंदोलन सुरू आहे. नागरिक संचारबंदी झुगारून रस्त्यावर उतरत आहेत. उत्तरप्रदेशात आत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक शहरांमध्ये दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

CAA PROTEST
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 21, 2019, 8:19 AM IST

Updated : Dec 21, 2019, 11:17 PM IST

  • केरळ - तिरुवनंतपूरममध्ये डाव्या पक्षांच्या युवा संघटनांनी नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात मशाल रॅली काढली.
  • गांधी, नेहरू यांनी पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांना दिलेले आश्वासन नागरिकत्व कायद्याने पूर्ण केले आहे - केरळचे राज्यपाल
  • रविवारी आसामच्या डिब्रूगडमध्ये सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे
  • रविवारी आसामच्या डिब्रूगडमध्ये सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आज महिलांनी आसाममध्ये आंदोलन केले. गुवाहाटी, हाझो, लखीमपूर आणि अमगुरी इत्यादीसह आसामच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला मोठ्या संख्येने जमा झाल्या.
  • देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) प्रक्रिया केल्यास रजिस्टरवर स्वाक्षरी न करणारा पहिला व्यक्ती मी असेल, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले आहे.
  • रविवारी जयपूरमध्ये नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात प्रदर्शन होणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मेट्रो सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
  • आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अमानतुल्लाह खान यांनी केली.
  • भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची जामिन याचिका फेटाळली. त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
  • उत्तरप्रदेशातील सितापूर जिल्ह्यात ४०० पेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हा दाखल
  • बिहारमधील भागलपूरमध्ये आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली
  • उत्तरप्रदेशातील हिंसक आंदोलनामध्ये आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • शुक्रवारी दर्यांगज येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे.
  • भीम आर्मी संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जामा मशिदजवळ आंदोलन करत असताना पोलिसांनी कारवाई केली.
  • दिल्लीत पोलिसांविरोधात पोलीस मुख्यालयासमोर नागरिकांचे आंदोलन
  • गुजरात सरकारने राजकोटमध्ये १ जानेवारी, २०२० पर्यंत कलम १४४ लागू केले आहे.
  • मध्य प्रदेशमधील 52 जिल्ह्यांपैकी 50 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. जबलपूरमध्ये आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
  • उत्तरप्रदेशात हिंसक आंदोलनामध्ये 6 जणांचा मृत्यू
  • कानपूरमध्ये आंदोलनात गोळीबार झाला असून 8 लोकांना गोळी लागली आहे.
  • मेरठमध्ये आंदोलनादरम्यान एका आंदोलकाचा मृत्यू
  • दिल्ली गेटजवळ आंदोलनाने हिंसक वळण घेतले.
  • आज सायंकाळी सीमपूर उड्डाणपूल आणि लोहा पूलच्या आसपासच्या भागात मोठ्या संख्येने निदर्शक जमा झाले होते. सध्याची परिस्थिती नियंत्रणात असून काही भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आल्याची माहिती डीसीपी व्ही.पी. सूर्य यांनी दिली.
  • बिहारमध्ये एनआरसी लागू होणार नाही, असे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी स्पष्ट केले आहे..
  • दिल्ली पोलिसांकडून चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्याचा प्रयत्न, मात्र त्यांच्या समर्थकांनी वेळीच त्यांना बाहेर नेले..
  • भाजपकडून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होतो आहे. संयुक्त राष्ट्र किंवा मानवाधिकार संस्थेने एखादी समिती नेमून, जनमत घ्यावे. - ममता बॅनर्जी (मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल)
  • हैदराबादमध्ये चारमिनारजवळ निदर्शनाला सुरुवात..
  • काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाला मंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली आहे, यामध्ये वरिष्ठ नेते एम. बी. पाटील यांचाही समावेश आहे.
  • दिल्लीतील जामा मस्जिद समोर आंदोलनाला सुरूवात झाली आहे. भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाददेखील याठिकाणी उपस्थित आहे.
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घराबाहेर निदर्शने करणाऱ्या दिल्ली महिला काँग्रेस अध्यक्षा शर्मिष्ठा मुखर्जी यांना अटक..
  • तामिळनाडू पोलिसांनी ६०० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये चेन्नईच्या वल्लुर कोट्टममध्ये आंदोलनासाठी आलेल्या अभिनेत सिद्धार्थ, संगीतकार टी. एम. कृष्णा, खासदार तिरूमावलवण आणि एम. एच. जवाहिरूल्ला यांचाही समावेश आहे. पोलिसांनी या आंदोलनासाठी परवानगी नाकारली होती. तरीही याठिकाणी आंदोलन करण्यात आल्याने, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • दोन पत्रकारांना अटक केल्याचे वृत्त खोटे, ते केरळहून आले होते, त्यांना परत पाठवण्यात आले आहे - बसवराज बोम्मई (गृहमंत्री, कर्नाटक)
  • ईशान्य दिल्लीमध्ये संचारबंदी, पोलीस 'ड्रोन'ने ठेवणार नजर; सोशल मीडियावरही ठेवणार लक्ष..
  • नागरिकत्व सुधारणा कायद्याला आमचा पहिल्यापासून विरोध, मात्र इतर पक्षांप्रमाणे हिंसक मार्गाने नाही - मायावती (अध्यक्षा, बसप)
  • नागरिकत्व सुधारणा कायद्याचा ठामपणे, मात्र शांततेच्या मार्गाने आणि परवानगी घेऊन विरोध करणार - असदुद्दीन ओवैसी (अध्यक्ष, एआयएमआयएम)
  • एआयएमआयएमच्या मुख्यालयात युनायटेड मुस्लीम अ‌ॅक्शन कमिटीची बैठक सुरू
  • केरळच्या पत्रकाराला मंगळुरूमधील वेनलॉक जिल्हा रूग्णालयातून अटक करण्यात आली..
  • भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना जामा मस्जिद ते जंतरमंतर पर्यंतच्या मोर्चाची परवानगी दिल्ली पोलिसांनी नाकारली.
  • आसाममधील इंटरनेट सेवा पूर्ववत, हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ११ डिसेंबरपासून करण्यात आली होती बंद..
  • मध्यप्रदेशच्या ४४ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू..

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विविध पक्षांकडून तसेच, संघटनांकडून मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव, ठिकठिकाणी संचारबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली होती. तसेच, दिल्लीच्या काही भागातील इंटरनेट, फोन कॉल आणि एसएमएस सेवाही ठप्प करण्यात आली होती.

ही संचारबंदी धुडकावून लावत, मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करत होते. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झालेली पहायला मिळाली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील एका व्यक्तीचा आणि कर्नाटकच्या मंगळुरू मधील दोघांचा जीव गेला. काल रात्री उशीरा मंगळुरूमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली, तसेच तिथली इंटरनेट सेवाही ४८ तासांसाठी बंद करण्यात आली.

Last Updated : Dec 21, 2019, 11:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details