नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीतील जाफराबाद येथे काल (शनिवारी) रात्री नागरिकत्व सुधारणा सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात आंदोलन झाले. यावेळी महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने मेट्रो स्टेशन खालील रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. त्यामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती.
दिल्लीतील जाफराबाद परिसरात सीएए, एनआरसी विरोधात आंदोलन - सीएए आंदोलन
आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बल तैनात करण्यात आले होते. महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बल तैनात करण्यात आले होते. महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी आंदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक रस्त्यावरून उठण्यास तयार नव्हते. पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्कीही झाली. पोलिसांना थोड्या प्रमाणात बळाचा वापरही करावा लागला.
शाहीन बाग येथील आंदोलनही मागील ७० दिवासांपासून सुरू आहे. काल दिल्लीतून नोयडा- फरीदाबादकडे जाणारा ९ नंबर रस्ता एका बाजूने खुला करण्यास आंदोलकांनी तयारी दर्शवली. शाहीन बागेतील आंदोलकांशी बोलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन मध्यस्थींची नियुक्ती केली आहे. आंदोलन दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची विनंती त्यांनी आंदोलकांना केली आहे. मात्र, अजून चर्चा यशस्वी झाली नाही. मागील आठवड्यात तमिळनाडूतील वाशिरामनपेट या भागातही सीएए विरोधी आंदोलन झाले. यावेळी झालेल्या हिंसाचारानंतर राज्यातील इतर शहरातही आंदोलनाचे लोन पसरले होते.