नवी दिल्ली -नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर, दिल्लीमध्ये काही मोर्चांचे आयोजन आज करण्यात आले होते. मात्र, या मोर्चांना दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. लाल किल्ला परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
हेही वाचा : नागरिकत्व सुधारणा कायद्याचा भारतीय मुस्लिमांशी संबंध नाही - शाही इमाम बुखारी
बंगळुरू -कर्नाटकमध्ये आज डावे पक्ष आणि मुस्लीम संघटनांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस उपायुक्त सिंधू रूपेश यांनी बंगळुरु आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये जमावबंदी (कलम १४४) लागू केली आहे. कलबुर्गी आणि धारवाड जिल्ह्यांमध्येही सीआरपीसी कायद्यांतर्गत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. २१ डिसेंबरला रात्री उशीरापर्यंत हे कलम लागू असेल.
हेही वाचा : नागरिकत्व सुधारणा कायद्याला गोव्यातील 'असोसिएशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईटस्'चा विरोध
लखनऊ - उत्तर प्रदेशमध्येही समाजवादी पक्षाने आज 'सीएए' विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण राज्यात आज कलम १४४ लागू करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे उपायुक्त ओ. पी. सिंह यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. तसेच कोणीही आंदोलनांमध्ये सहभागी होऊ नये, पालकांनीही याबाबत आपल्या पाल्यांना मार्गदर्शन करावे, अशा आशयाचे हे ट्विट होते.
तरीही आपण नियोजनाप्रमाणे आंदोलन करणार असल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. यासोबतच, उत्तर प्रदेशमध्ये काही मुस्लीम संघटनांनीही आज आंदोलनाची हाक दिली आहे.
उत्तर प्रदेश सरकारने १९ आणि २० डिसेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या दोन दिवसांमध्ये असलेल्या नियोजीत परिक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : CAA : पूर्व भारतात अनागोंदी...