सीएए-एनपीआर विषयांवर सकारत्मक चर्चा गरजेची - व्यंकय्या नायडू - VENKAIAH NAIDU
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) यासारख्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा आवश्यक असल्याचे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे.
हैदराबाद - सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) यासारख्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा आवश्यक असल्याचे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. दिवंगत एम.चेन्ना रेड्डी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये नायडू बोलत होते.
'सीएए किंवा एनपीआर हे कशासाठी लागू केले जात आहे. या कायद्यांचा काय परिणाम होईल आणि यात कोणते बदल आवश्यक आहेत. यावर विविध संघटना, मंडळे आणि माध्यमांनी सहभाग घेऊन अर्थपूर्ण आणि सकारात्मक चर्चा करायला हवी. जर आपण यावर चर्चा केली, तर आपली यंत्रणा बळकट होईल आणि लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचेल', असे नायडू म्हणाले.
सध्या देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी याविरोधात आंदोलने होत आहेत. काही ठिकाणी आंदोलनांनी हिंसक वळण घेतल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे.