महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गोव्यात २६ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित; दोन लोकसभेसह तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक - loksabha elecation

राज्यभरात पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शिवाय प्रत्येक मतदारसंघात भरारी पथकही तैनात करण्यात आले आहे.

गोव्यातील निवडणूकीबाबत माहिती देताना अधिकारी

By

Published : Apr 23, 2019, 2:31 AM IST

पणजी - गोव्यात मंगळवारी दोन लोकसभा आणि तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. राज्यात एकूण ११५२ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्यापैकी २६ मतदान केंद्रांवरील परिस्थिती संवेदनशील असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.


संवेदनशील घोषीत करण्यात आलेल्या २६ मतदानकेंद्रापैकी २१ केंद्रे हे दक्षिण गोव्यातील सावर्डे विधानसभा मतदारसंघातील आहेत. तर उत्तर गोव्यात ५ मतदान केंद्रे आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकची पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. तर आचारसंहिता लागू झाल्यापासून २१ मार्चपर्यंत ५ कोटी ५९ लाखांहून अधिक रकमेची दारूही जप्त करण्यात आली आहे.

गोव्यातील निवडणूकीबाबत माहिती देताना अधिकारी


यासंदर्भात बोलताना गोव्याचे पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंह यांनी सांगितले, की राज्यातील सातही सीमासुरक्षा नाक्यांवर प्रत्येक वाहनाची कडक तपासणी करण्यात येत आहे. राज्यभरात पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शिवाय प्रत्येक मतदारसंघात भरारी पथकही तैनात करण्यात आले आहे.


राज्याच्या सीमेवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही योग्य ती दक्षता घेत आहोत. तसेच शेजारील राज्यातील सिंधुदुर्ग, बेळगाव आणि कारवार जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांशी या संदर्भात संयुक्त बैठक घेण्यात आल्याचेही सिंह यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details