नवी दिल्ली -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे वाहतूक आणि इतर व्यवहार ठप्प आहेत. आनंद विहार भागातून उत्तर प्रदेशला प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५० गाड्या आत्तापर्यंत दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
या गाड्यांचे वाहक आणि चालकही पोलिसांच्या ताब्यात आहेत. या खासगी बस कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधांनांना मदतीसाठी साकडे घातले आहे. दिल्ली सरकारने विशेष करार करून बस असोसिएशनकडून ३०० बस घेतल्या होत्या. २९ मार्चला सकाळी या गाड्यांनी प्रवासी वाहतूकीला सुरुवात केली होती. मात्र, काही काळातच आदेश आल्याने दिल्ली पोलिसांनी या गाड्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.