महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

VIDEO: दुचाकीस्वार डळमळला अन्, बसच्या टपावरील स्टंटवीरांना 'सांडता' भुई थोडी - students

स्टंट करण्याची मुलांची ही काही पहिलीच घटना नाही, पण अशाच घटना या जीवावर बेतू शकतात. त्यामुळे सावध राहणेही महत्त्वाचे आहे. मद्रास उच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या सेलिब्रेशन्सवर बंदी घातली आहे. मात्र, काही प्रमाणात ती चालत आहेत.

'बस डे' सेलिब्रेशन

By

Published : Jun 18, 2019, 7:05 PM IST

नवी दिल्ली - तमीळनाडूमध्ये 'बस डे'साजरा करताना बसच्या टपावर बसलेली मुले चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे खाली कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने, बसचा वेग कमी असल्यामुळे बसच्या पुढ्यातच पडलेली ही मुले बसखाली आली नाहीत. त्यामुळे अपघात टळला आणि हशाला उधाण आले. मात्र, या प्रकारानंतर रहदारी नियंत्रक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना चांगलेच झापले.

'बस डे' सेलिब्रेशन
उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी शाळा आणि कॉलेजेस उघडली आहेत. त्यात बस डे सेलिब्रेशनसाठी मुलांचे उत्साहाने बससोबत फोटोसेशन सुरू होते. ही वानरसेना मौजमस्तीच्या नादात बसच्या टपावर चढली. या टपावर बसलेल्या मुलांसह हळूहळू चालणाऱ्या बसचे चित्रीकरण करण्यात येत होते. तसेच, फोटोही काढण्यात येत होते. यादरम्यानच बसच्या पुढे २ दुचाकीस्वार ही मौज पाहात निघाले होते. मागे पाहणाऱ्या दुचाकी चालकाचा तोल गेल्यामुळे पाठून येणाऱ्या बसचालकाने ब्रेक लावला. यामुळे एका क्षणात टपावरील अर्धी जनता खाली बसच्या पुढ्यात रस्त्यावर पडली. अनेक जण त्यांना उचलायला धावले. यामुळे रहदारी थांबली. मात्र, यातील कोणालाही फारसे लागले नव्हते. यामुळे या प्रकारावर हास्य विनोद सुरू झाले. या प्रकारानंतर ट्रॅफिकवाल्या मामाने सर्वांची खरडपट्टी काढण्यास सुरुवात केल्यानंतर मात्र, एकेकाने पळ काढण्यास सुरुवात केली.या गोंधळानंतर तमीळनाडू पोलिसांनी २४ मुलांना ताब्यात घेतले होते. स्टंट करण्याची मुलांची ही काही पहिलीच घटना नाही, पण अशाच घटना या जीवावर बेतू शकतात. त्यामुळे सावध राहणेही महत्त्वाचे आहे. मद्रास उच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या सेलिब्रेशन्सवर बंदी घातली आहे. मात्र, काही प्रमाणात ती चालत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details