महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थान सत्तासंघर्ष : काँग्रेसचा विश्वासदर्शक ठराव तर भाजप आणणार अविश्वास ठराव, बसपाच्या सहा आमदारांना काँग्रेस विरोधात मतदान करण्याचे निर्देश - राजस्थान सत्तासंकट

राजस्थान सरकार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. तर या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा यांच्यामार्फत राजस्थान विधानसभेवर निवडून आलेल्या आपल्या सहा आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. तसेच या सर्वांना विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी किंवा राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनातील अन्य कार्यवाहीत काँग्रेसविरोधात मतदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

rajasthan political crisis
राजस्थान सत्तासंकट

By

Published : Aug 14, 2020, 10:24 AM IST

जयपूर (राजस्थान) -राज्यात मागील काही दिवसांपासून सत्ता नाट्य सुरु आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट आणि समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यापासून गेहलोत सरकार धोक्यात आले होते. मात्र, सचिन पायलट यांच्या अडचणी सोडविण्यासाठी काँग्रेसने समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा वाद संपुष्टात येताना दिसत आहे. यानंतर आज (शुक्रवारी) १४ ऑगस्टला राजस्थान सरकार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. तर या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाने राष्ट्रीय सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा यांच्यामार्फत गुरुवारी राजस्थान विधानसभेवर निवडून आलेल्या आपल्या सहा आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. तसेच या सर्वांना विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी किंवा राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनातील अन्य कार्यवाहीत काँग्रेसविरोधात मतदान करण्याचे निर्देश देण्यात आले.

त्यापैकी जर एखाद्याने या आदेशाचे उल्लंघन केले तर त्यांना भारतीय संविधानाच्या दहाव्या अनुसूचीच्या अनुच्छेद 2 (एल) (बी) अंतर्गत अपात्र ठरविले जाईल, असे व्हीपमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सर्व सहा आमदारांना स्वतंत्र नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ज्यात त्यांना अशी माहिती देण्यात आली आहे की, बसपा हा एक मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहे. यामुळे राज्य पातळीवरील अनुसूचीतील अनुच्छेद (4) अंतर्गत सहा आमदारांच्या म्हणण्यानुसार पक्ष विलीनीकरण करता येणार नाही. म्हणूनच ते सभापतींच्या कोणत्याही बेकायदेशीर आणि असंवैधानिक आदेशानुसार विलिनीकरणाच्या तसेच अनेकांच्या विरुद्ध दावा करू शकत नाहीत.

यापुढे नोटिसामध्ये असे नमूद केले गेले आहे, की बसपाचे सहा आमदार अपात्रतेसाठी अपयशी ठरतील अशा ‘व्हिप’ चे पालन करण्यास बांधील आहेत. बसपासाठी निवडणूक लढविलेल्या आणि नंतर काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सहा आमदारांमध्ये राजेंद्र गुधा, वजीब अली, जोगिंदर अवाना, संदीप यादव, लखन मीना, दीपचंद खेरिया यांचा समावेश आहे.

भाजप काँग्रेस सरकारविरोधात मांडणार अविश्वासदर्शक ठराव -

राजस्थानात आज (शुक्रवारी) विधीमंडळाचे सत्र सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यामध्ये वाद सुरू होता. काल (गुरुवारी) सत्ताधारी काँग्रेस विधिमंडळ नेत्यांची बैठक गेहलोत यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला सचिन पायलटही उपस्थित होते. दरम्यान, आज (शुक्रवारी) सभागृहात काँग्रेस सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याचे भाजपाने जाहीर केले आहे. तर काँग्रेस पक्षांतर्गत सुरु असलेला वाद निवळत असल्याचे दिसून येत आहे. सचिन पायलट आणि समर्थक आमदारांनी सरकार विरोधात बंडाचा झेंडा उभारला होता. मात्र, पक्षनेतृत्वाने लक्ष घातल्याने हा वाद मिटण्याच्या मार्गावर आहे.

भाजपकडे ७२ आमदारांचे संख्याबळ आहे. तीन आरएलपी पक्षाच्या आमदारांना मिळून भाजपच्या बाजूने ७५ आमदार आहेत. अशा परिस्थितीत जर भाजप अविश्वास ठराव आणत असेल तर त्यांना अपक्ष आणि बंडखोर आमदारांचा पाठिंबा घ्यावा लागेल. आम्ही प्रस्ताव मांडणार आहोत. जे सरकारच्या विरोधात असतील ते ठरावाच्या बाजूने मतदान करतील, असे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया म्हणाले. दरम्यान, काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.

१४ ऑगस्टला विश्वासदर्शक ठराव झाल्यानंतर १५ ऑगस्टपासून आमदारांनाही मोकळे सोडण्यात येईल. मागील काही दिवसांपासून भाजप हे गेहलोत सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना सुरक्षित ठेवले आहे. एकदा विश्वासदर्शक ठराव झाल्यानंतर आमदारांना मोकळे सोडण्यात येईल. दरम्यान, १४ ऑगस्टला अविश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याचे भाजपनेही जाहीर केले आहे. त्यामुळे राजस्थानात सध्या मतांची जुळवाजुळव सुरु आहे.

एकदा विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर पुढील सहा महिने विश्वासदर्शक ठराव मांडता येत नाही. त्यामुळे सहा महिने तरी राजस्थानातील सत्तासंघर्ष निवळेल. दरम्यान बहुजन समाजवादी पक्षाच्या सहा आमदारांनी मागील वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यावर सहा आमदारांचे भवितव्य निर्भर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details