महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बीएसएफ जवान - बांगलादेशी सुरक्षा रक्षकांमध्ये ईदनिमित्त मिठाईची देवाण-घेवाण - ईद लेटेस्ट न्यूज

सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शनिवारी ईद अल-अधाच्या निमित्ताने फुलबारी येथील भारत-बांगलादेश सीमेवर बांगलादेशी सुरक्षा रक्षकांसोबत (बीजीबी - बॉर्डर गार्डस बांगलादेश) मिठाईची देवाणघेवाण केली.

ईदनिमित्त मिठाईची देवाण-घेवाण
ईदनिमित्त मिठाईची देवाण-घेवाण

By

Published : Aug 1, 2020, 6:58 PM IST

फुलबारी (पश्चिम बंगाल) - सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शनिवारी ईद अल-अधाच्या निमित्ताने फुलबारी येथील भारत-बांगलादेश सीमेवर बांगलादेशी सुरक्षा रक्षकांसोबत (बीजीबी - बॉर्डर गार्डस बांगलादेश) मिठाईची देवाणघेवाण केली. यापूर्वी शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद अल-अधानिमित्त देशाला शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रपतींनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रत्येकाला गरजूंमधील आनंदाची देवाण-घेवाण करण्याचे आणि सामाजिक अंतराच्या निकषांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. तसेच, कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या. "ईद मुबारक! ईद अल-अधाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्याला एक न्याय्य, सुसंवादी आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याची प्रेरणा देईल. सर्वांमध्ये बंधुता आणि करुणेची भावना वाढीस लागावी," असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details