पाटणा - राज्यपाल कळसुत्री बाहुले असते का? असा वादग्रस्त प्रश्न बिहारच्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला आहे. या प्रश्नाची बरीच चर्चा झाली. राज्यसेवा आयोगाने यामध्ये आपली चूक नसल्याचे सांगितले आहे.
राज्यपाल कळसुत्री बाहुले असते का? राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत वादग्रस्त प्रश्न - Bihar Public Service Commission
राज्यपाल कळसुत्री बाहुले असते का, असा वादग्रस्त प्रश्न बिहारच्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला आहे
रविवारी बिहारमधील राज्यसेवा आयोगाची मुख्य परीक्षा पार पडली आहे. यामध्ये सामान्य ज्ञानाच्या दुसऱ्या पेपरमध्ये भारताच्या आणि विशेषत: बिहारच्या राजकारणातील राज्यपालांचे स्थान काय? ते केवळ कुळसुत्री बाहुले असते का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
या प्रश्नाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावर आयोगाने खंत व्यक्त केली. प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला असून यामध्ये शिक्षक दोषी असल्याचे आयोगाने म्हटले आहे. याचबरोबर पेपर सेट करणाऱ्या शिक्षकाला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. बिहारमध्ये सध्या संयुक्त जनता दल आणि भाजपची सत्ता आहे. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे.