महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी चिदंबरम यांचा सरकारला सल्ला - business news

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी रविवारी मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारला संकोच न करता कर्ज घेण्याचे सुचवले आहे.

चिदंबरम
चिदंबरम

By

Published : Sep 6, 2020, 3:23 PM IST

नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी रविवारी मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारला संकोच न करता कर्ज घेण्याचे सुचवले आहे. तसेच त्यांनी सरकारला पैशाच्या उभारणीसाठीही काही उपाय सुचविले आहेत. ज्यात एफआरबीएम मानदंडांना शिथिल करणे, निर्गुंतवणुकीची गती वाढवणे आणि जागतिक बँकांकडून पैसे घेणे यांचा समावेश आहे.

अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून, 50 टक्के गरीब कुटुंबांना रोख रक्कम हस्तांतरित करणे, अन्नधान्य देण्याची आणि पायाभूत सुविधांवरील खर्च वाढवण्याबरोबरच राज्यांना जीएसटी भरपाईची थकबाकी देण्याचे चिदंबरम यांनी सुचवले आहे.

एफआरबीएमच्या तरतुदी सुलभ करा. संकोच न करता कर्ज घ्या. निर्गुंतवणुकीचा वेग वाढवा तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, आशियाई विकास बँक इ.ची 6.5 अब्ज डॉलर्सच्या ऑफरचा वापर करा, असे चिदंबरम यांनी टि्वटच्या माध्यमातून सरकारला सांगितले.

दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून एप्रिल ते जून या तिमाहीत देशाचा जीडीपी उणे 23.9 टक्के झाला आहे. आधीच डबघाईला आलेली अर्थव्यवस्थआ कोरोनामुळे मंदीत सापडली आहे. लॉकडाऊन काळात उद्योगधंदे बंद असल्याने उत्पादन क्षेत्रासह पर्यटन, सेवा, बँकिंग, निर्मिती, आयात निर्यात, कृषी, मनोरंजन सर्वच क्षेत्रे डबघाईला आली आहेत. मोदी सरकारने काही महिन्यांपूर्वी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. मात्र, त्यानंतरही अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details