महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 24, 2019, 8:58 PM IST

ETV Bharat / bharat

ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आहेत 'भारताचे जावई'

बोरिस जॉन्सन यांचे भारताशी खास नाते आहे. बोरिस यांच्या पत्नी मरीना व्हीलर ह्या मूळ भारतीय वंशाच्या असल्याने बोरिस हे भारताचे जावई आहेत.

भारताचे जावाई'

नवी दिल्ली - लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधानपद आहेत. बोरिस जॉन्सन यांचे भारताशी खास नाते आहे. बोरिस यांच्या पत्नी मरीना व्हीलर ह्या मूळ भारतीय वंशाच्या असल्याने बोरिस हे भारताचे जावई आहेत.


बोरीस यांच्या पत्नी मरीना व्हीलर यांची आई दीप सिंह ह्या शीख होत्या. वेस्ट ससेक्स येथे राहिल्यानंतर त्यांनी 1961 मध्ये ब्रिटिश पत्रकार चार्ल्स व्हीलर यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. दिप सिंह यांनी चार्ल्स व्हीलर यांच्याशी लग्न करण्यापूर्वी प्रख्यात लेखक खुशवत सिंह यांचे भाऊ दलजीत सिंह यांच्यासोबत लग्न केले होते. बोरीस हे मरीनासोबत अनेकवेळा भारतात आले आहेत. सध्या मरीना आणि बोरीस यांचा घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.


ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी आणि सत्तारूढ कंझर्वेटीव्ह पार्टीच्या नेतेपदासाठी सोमवारी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये पक्षाच्या 1 लाख 60 हजार कार्यकर्त्यांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केले. मतदान प्रक्रियेदरम्यान, जॉन्सन हे आघाडीवर होते. ब्रिटनच्या संविधानानुसार बहुमत असलेल्या पक्षाचा नेताच पंतप्रधानपदी विराजमान होतो. बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची जागा घेतील. ब्रेक्झिटनंतर थेरेसा मे यांनी 7 जूनला पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details