महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भीमा कोरेगाव हिंसाचार: सुधा भारद्वाज, फेरेरा, गोन्सालविस यांचा उच्च न्यायालयाने नाकारला जामीन - भिमा कोरेगाव हिंसाचार

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज, अरुण फेरेरा, व्हेरनॉन गोन्सालविन्स यांना जामीन नाकारला आहे.

मुंबई उच्च न्यायालय

By

Published : Oct 15, 2019, 4:15 PM IST

मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज, अरुण फेरेरा, व्हेरनॉन गोन्सालविन्स यांना जामीन नाकारला आहे. उच्च न्यायलयाने जामीनाबाबतच्या सर्व याचिका नामंजूर केल्या आहेत.

मुंबई उच्च न्यायालयामध्ये मागील एक महिन्यापासून याप्रकरणी सुनावणी सुरू होती. न्यायमूर्ती सारंग कोतवळ यांनी याचिकेवर निर्णय दिला. न्यायालयाने ७ ऑक्टोबर पासून याचिकांवरील निर्णय राखून ठेवला होता. डिसेंबर २०१७ ला एल्गार परिषद आयोजित केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आले होती. एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार उफाळून आला, असा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे.

तिघांना बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड विधानच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात पुणे जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायाधिशांनी तिघांना जामीन नाकारला होता. जामीन नाकारल्यानंतर तिघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

अरुण फेरेरिया आणि व्हेरनॉन गोन्सालविस बंदी घालण्यात आलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) संघटनेत भरती करत असल्याचा आरोप पुणे पोलीस आणि अतिरिक्त सरकारी वकील अरुणा पाय यांनी युक्तिवाद करताना केला आहे. तिघेही कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) संघटनेशी संबधीत इतर संघटनांचे सदस्य आहेत, असा युक्तीवादही पुणे पोलिसांनी न्यायालयात केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details