लातेहार(झारखंड)- केंद्रीय राखीव पोलीस दल(सीआरपीएफ) च्या जवानांनी झारखंड राज्यातील लातेहार जिल्ह्यातील गारु प्रखंड येथील बकुळाबंध जंगलातून नक्षलवाद्यांनी लपवलेले बॉंम्ब जप्त केले. यानंतर ते बॉम्ब सीआरपीएफने निकामी केले आहेत, अशी माहिती समादेशक अनिल कुमार मीना यांनी दिली.
सर्व बॉम्ब केले निकामी
गारु पोलीस ठाणे हद्दीत सीआरपीएफच्या जवान नक्षलवाद्यांच्या विरोधात शोधमोहीम राबवत होते. यादरम्यान बकुळाबंध येथे भाकपा माओावदी या संघटनेने जमीनीत लपवून ठेवलेले बॉंम्ब जवानांनी जप्त केले. सीआरपीएफच्या बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने ते निकामी केले आहेत.
सीआरपीएफच्या 214 ए कंपनीचे सहाय्यक समादेशक अनिल कुमार मीना यांनी निकामी करण्यात आलेले बॉम्बची मोठ्या क्षमतेचे होते असे सांगितले. 5 टिफिन बॉम्ब, एक कुकर बॉम्ब, 2 केन बॉम्ब आणि 10 किलो अमोनियम नायट्रेट पावडर जप्त केली आहे. सीआरपीएफ कडून जंगलात शोधमोहीम सुरु आहे.