नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे बंडखोर नेते कपिल मिश्रा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांनीच विरोध दर्शवला आहे. मिश्रा यांच्या करावल नगर मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांचा पुतळा जाळला आहे.
कपिल मिश्रांच्या पक्ष प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध; आंदोलन करून जाळला पुतळा - पंतप्रधान मोदी
आम आदमी पार्टीचे बंडखोर नेते कपिल मिश्रा यांच्या भाजप प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचाच विरोध आहे. कपिल मिश्रांना पक्षातून बाहेर काढण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.
कपिल मिश्रांच्या भाजप प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध; आंदोलन करत जाळला पुतळा
मोदींबद्दल वापरले होते अपशब्द
कपिल मिश्रांनी पंतप्रधान मोदींना शिवी दिली होती, संघप्रमुख मोहन भागवत यांना ते आयएसआयचा एजंट म्हणाले होते. तसेच दिल्ली विधानसभेत अमित शहांना अपशब्द वापरले होते. या सर्व कारणांमुळे भाजप कार्यकर्ते संतप्त आहेत. कपिल मिश्रांना पक्षातून बाहेर काढण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरू केली आहेत.