महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य; गळा कापण्याची दिली धमकी - धमकी

सोयम बापू म्हणाले, आदिवासी बांधवांच्या मागे गेलात तर, तुमचा गळा कापला जाईल. तुम्ही आमच्या मागे पडू नका, आम्ही तुमच्या मागे पडलो तर, अवघड होऊन जाईल.

भाजप खासदार सोयम बापू यांचे वादग्रस्त वक्तव्य

By

Published : Jun 25, 2019, 7:49 AM IST

Updated : Jun 25, 2019, 8:26 AM IST

नवी दिल्ली- तेलंगाणातील भाजप खासदार सोयम बापू यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी एका समुदायाबद्दल चिथावणीखोर वक्तव्य करताना गळा कापण्याची धमकी दिली आहे. सोयम बापूच्या या वक्तव्यानंतर अल्पसंख्यांक समुदायाच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

भाजप खासदार सोयम बापू यांचे वादग्रस्त वक्तव्य

सभेला संबोधित करताना सोयम बापू म्हणाले, मी मुसलमानांच्या मुलांना एवढेच सांगु इच्छितो, की आमच्या आदिवासी बांधवांच्या मागे गेलात तर, तुमच्या गळा कापला जाईल. तुम्ही आमच्या मागे पडू नका, आम्ही तुमच्या मागे पडलो तर, अवघड होऊन जाईल. तुमचे नाटक बंद करा.

सोयम बापूंचा असा आरोप आहे, की तेलंगाणातील आदिवासी जिल्ह्यात मुस्लिम समुदायाच्या मुलांकडून आदिवासी समाजाच्या महिलांचे उत्पीडन होत आहे. त्यामुळे आम्ही याच्याविरोधात आहोत. मुस्लिम मुलांचे वागणे असेच राहिले, तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असेही सोयम बापू म्हणाले आहेत.

Last Updated : Jun 25, 2019, 8:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details