नवी दिल्ली -महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हणाल्यामुळे भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यावर देशभरातून टीका होत आहे. त्यानंतर आज प्रज्ञा ठाकूर यांनी लोकसभेमध्ये याबाबत माफी मागितली. माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्यासाठी मी माफी मागते असे त्या म्हणाल्या.
यानंतर बोलताना त्या म्हणाल्या, की सभागृहातील एका सदस्याने मला 'दहशतवादी' असे संबोधित केले. हा माझ्या प्रतिष्ठेवर घाला आहे. माझ्यावरील कोणतेही आरोप आत्तापर्यंत सिद्ध झालेले नाहीत. माझ्या कालच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी महात्मा गांधीजींचा आदर करते, असेही त्या म्हणाल्या.