महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'आम्ही ८० तर तुम्ही १८  टक्के, सीएएला विरोध करू नका, नाहीतर...' - सोमेश्वर रेड्डी

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या अल्पसंख्य मुस्लीम समुदायााला कर्नाटकातील भाजप खासदाराने धमकी दिली आहे. 'या देशामध्ये राहायचं असेल तर बहुसंख्यांपासून जपून राहा, असे भाजप आमदार सोमेश्वर रेड्डी म्हणाले आहेत.

सोमेश्वर रेड्डी
सोमेश्वर रेड्डी

By

Published : Jan 4, 2020, 3:27 PM IST

नवी दिल्ली-नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या अल्पसंख्य मुस्लीम समुदायाला कर्नाटकातील भाजप खासदाराने धमकी दिली आहे. आम्ही ८० तर तुम्ही १८ टक्के आहात. सीएए कायद्याला विरोध करण तुमच्यासाठी चांगल नाही, जर विरोध केला तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, अशी धमकी सोमशेखर रेड्डी यांनी दिली आहे.

'या देशामध्ये राहायचं असेल तर बहुसंख्यांपासून जपून राहा. हा आमचा देश आहे. जर तुम्हाला येथे राहायचे असेल तर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला येथील संस्कृती पाळावी लागेल. सीएए आणि एनआरसी मोदी आणि शाहांनी बनवलेला कायदा आहे, जर तुम्ही या कायद्यांना विरोध केला तर हे तुमच्यासाठी चांगले नाही, असे रेड्डी म्हणाले. 'जर तुमची इच्छा असेल तर पाकिस्तानात जा, आम्हाला काही अडचण नाही. जाणूनबुजून आम्ही तुम्हाला पाकिस्तानात पाठवणार नाही. सर्वांनी हिंदूबरोबर सामंजस्याने रहा. पण जर तुम्ही शत्रूसारखे वागाल, तर आम्हीही शत्रूप्रमाणे वागू', असे रेड्डी म्हणाले. याआधी बंगळुरुमधील भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी सीएए कायद्याला विरोध करणाऱ्यांना 'पंक्चरवाला' असे संबोधले होते. देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात हिंसक आंदोलने झाली आहेत. दिल्लीसह अनेक ठिकाणी अजूनही आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान २० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details