महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

' हो, लालूंनी मला फोन केला आणि मंत्रीपदाचे आमिष दिले' - सुशील मोदी

जेव्हा मला फोन आला. तेव्हा मी सुशील मोदी यांच्या घरी होतो. लालू प्रसाद यादव यांचा फोन आल्याचे समजल्यानंतर सर्वच जण चकीत झाले. सुदैवाने सर्व संभाषण फोनमध्ये रेकार्ड झाले, असे पासवान यांनी सांगितले.

ललन पासवान
ललन पासवान

By

Published : Nov 25, 2020, 5:06 PM IST

पाटणा -बिहार विधानसभा अध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केला. यावरून बिहारमधील राजकारण तापले आहे. लालू प्रसाद यादव यांनी मला फोन केला आणि महागठबंधनच्या उमेदवाराला मतदान करण्यास सांगितले, असा दावा भागपूरच्या पीरपैती येथील भाजपाचे आमदार ललन पासवान यांनी केला.

लालू प्रसाद यादव फोनवर असल्याचे माझ्या स्वीय सहाय्यकाने सांगितले. निवडणुकीतील विजयाचे अभिनंदन करण्यासाठी फोन केला असेल, असे मला वाटले. मी फोन घेतला आणि त्यांना नमस्कार केला. तेव्हा त्यांनी मला मंत्रीपदाचे आश्वानस दिले आणि महागठबंधनच्या उमेदवाराला मत देण्यास सांगितले, असे ललन पासवान यांनी सांगितले.

जेव्हा मला फोन आला. तेव्हा मी सुशील मोदी यांच्या घरी होतो. लालू प्रसाद यादव यांचा फोन आल्याचे समजल्यानंतर सर्वच जण चकीत झाले. सुदैवाने सर्व संभाषण फोनमध्ये रेकार्ड झाले, असे पासवान यांनी सांगितले.

लालूंवर आमदार फोडण्याचा आरोप -

बिहार विधानसभा अध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये महागठबंधनच्या बाजूने मतदान करण्यासाठी, लालूप्रसाद यादव यांनी एनडीएच्या आमदारांना फोन करून त्यांना मंत्रीपदाचे आमिष दाखवले, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केला आहे. सुशील मोदी यांनी एक ऑडिओही जारी केला आहे. ज्यामध्ये लालूप्रसाद यादव एनडीएच्या आमदारांना मंत्रीपदाचे आश्वानस देत असून कोरोनाचं कारण देत अनुपस्थित राहण्यासाठी सांगत आहेत.

भाजपाचे आमदार ललन पासवान

बिहार विधानसभा अध्यक्षपदी विजय सिन्हा यांची निवड -

बिहार विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान पार पडले. महागठबंधनच्या बाजूनं अवध बिहारी चौधरी तर एनडीएच्या बाजूने माजी मंत्री आणि लखीसराय येथील आमदार विजय सिन्हा मैदानात होते. विजय सिन्हा यांचा विजय झाला असून त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. याची घोषणा जीतन राम मांझी यांनी केली. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक एनडीएच्या प्रतिष्ठेची झाली होती. विजय सिन्हा यांच्या बाजूने 126 आणि विरोधामध्ये 114 मते पडली.

ABOUT THE AUTHOR

...view details