नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षातर्फे (भाजप) रविवारी (ता. ७) 'निवडणूक जाहीरनामा' सादर केला जाण्याची शक्यता आहे. २०१९ 'संकल्प पत्र' असे नाव याला देण्यात आले आहे. २०१४ मध्येही याच तारखेला भाजपने जाहीरनामा सादर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह तसेच यांच्यासह २० जणांच्या जाहीरनामा समितीतील काही केंद्रीय मंत्रीही यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजप रविवारी 'निवडणूक जाहीरनामा' सादर करण्याची शक्यता - bjp manifesto
पक्षाने यासाठी तब्बल १० कोटी लोकांकडून यासाठी सूचना मागवल्या होत्या. यासाठी १५ उपसमित्या तयार करण्यात आल्या होत्या. २०१४ साठी भाजपने नऊ टप्प्यांतील निवडणुकांसाठी ७ एप्रिललाच जाहीनामा सादर केला होता.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, रविशंकर प्रसाद, पियूष गोयल, अरुण जेटली, मुख्तार अब्बास नक्वी आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचाही या समितीत सहभाग होता. पक्षाने यासाठी तब्बल १० कोटी लोकांकडून यासाठी सूचना मागवल्या होत्या. यासाठी १५ उपसमित्या तयार करण्यात आल्या होत्या. २०१४ साठी भाजपने नऊ टप्प्यांतील निवडणुकांसाठी ७ एप्रिललाच जाहीनामा सादर केला होता.
या खेपेस निवडणूक आयोगाने कोणताही पक्ष निवडणुकीआधी ४८ तासांमध्ये कसलाही जाहीरनामा प्रदर्शित करणार नाही, असा आदेश जारी केला आहे. ७ टप्प्यांमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका ११ एप्रिलला सुरू होणार आहेत.