बंगळुरू- विधानसभेत बहुमत चाचणीत काँग्रेस-जेडी(एस)च्या बाजूने ९९ तर, भाजपच्या बाजूने १०५ आमदारांनी उभे राहुन पाठिंबा दिला. यानंतर कर्नाटकातील राजकीय घडामोडीवर अखेर पडदा पडला आणि कुमारस्वामींचे सरकार कोसळले. कुमास्वामींचे सरकार कोसळल्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेसाठी लगभग सुरू केली आहे.
कर्नाटक : भाजपची सत्ता स्थापनेसाठी 'लगीनघाई', सकाळी 11 वाजता होणार बैठक - meeting
कर्नाटकमध्ये राजकीय भूकंपात कुमारस्वामीचे सरकार कोसळले. यानंतर भाजपने सत्तास्थापनेसाठी लगभग सुरु केली आहे. काल मंगळवारी रात्री उशिरा येडीयुरप्पा यांनी आपल्या भाजप आमदारांसह रमाडा हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकले नाही. मात्र, आज बुधवारी सकाळी 11 वाजता पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप झाला असून यामध्ये कुमारस्वामींचे सरकार कोसळले. यानंतर भाजपने सत्तास्थापनेसाठी लगभग सुरु केली आहे. काल मंगळवारी रात्री उशिरा येडीयुरप्पा यांनी आपल्या भाजप आमदारांसह रमाडा हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकले नाही. मात्र, आज बुधवारी सकाळी 11 वाजता पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सूत्राच्या माहितीनुसार या बैठकीत सत्ता स्थापनेविषयी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
कुमारस्वामींचे सरकार कोसळल्यानंतर येडीयुरप्पा यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहले आहे. त्या पत्रात त्यांनी अमित शाह यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी या पत्रात भाजपला समर्थन देणाऱ्या सगळ्या नेत्यांचे आभारही मानले आहे.