महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लैंगिक अत्याचार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना १४ दिवसांची कोठडी

तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली आहे.

भाजप नेते चिन्मयानंद

By

Published : Sep 20, 2019, 11:06 AM IST

Updated : Sep 20, 2019, 12:00 PM IST

लखनऊ- तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) उत्तरप्रदेशातील शहाजहापूर येथून चिन्मयानंद यांना अटक केली आहे. जिल्हा रुग्णालयात त्यांना वैदकीय तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालयाबाहेर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्वामी चिन्मयानंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

स्वामी चिन्मयानंद यांना अटक केल्याची माहिती त्यांचे वकिल पूजा सिंह यांनी दिली. शहाजहापूर येथील कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. यासंबधीचा एक व्हिडिओही समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या प्रकरणी एसआयटीने मागील शुक्रवारी चिन्मयानंद यांची ७ तास चौकशी केली होती.

तपास पथकाने चिन्मयानंद यांना तरुणीने केलेल्या आरोपासंबधी प्रश्न विचारले. तसेच व्हायरल व्हिडिओ बाबत चौकशी केली. लावण्यात आलेल्या आरोपांवर चिन्मयानंद यांची बाजूही ऐकून घेण्यात आली. तसेच तरुणी ज्या वसतीगृहात राहते तेथील साक्षीदारांचीही पोलिसांनी चौकशी केली.

स्वामी चिन्मयानंद यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहे. माझ्या विरोधात कोणीतरी षड्यंत्र रचले असल्याचे ते म्हणाले आहेत. लवकरच मी एका मोठ्या महाविद्यालयाची स्थापन करणार होतो. त्यात अडचण निर्माण करण्यासाठी मला लैंगिक आरोपामध्ये गुंतवण्यात आल्याचे ते म्हणाले.

Last Updated : Sep 20, 2019, 12:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details