लखनौ- भाजपच्या स्थानिक नेत्याने एका व्यक्तीला पोलीस व प्रशासनाच्या बैठकीमध्ये गोळ्या घालून ठार केले. ही धक्कादायक बालिया गावात घडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. रेशन दुकानाचे वितरण करण्यासाठी या गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपच्या नेत्याने गोळ्या घालून पोलिसांसमोर ४६ वर्षीय व्यक्तीला केले ठार - Ballia murder news
रेशन दुकानाचे वाटप करण्याच्या वादात भाजपच्या नेत्याचा गोळ्या घालून खून केला आहे. विशेष म्हणजे यावेळी पोलीस अधिकारीही उपस्थित होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपविभागीय दंडाधिकारी, मंडल अधिकारी आणि उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे पचे नेते धीरेंद्र प्रतास सिंह याने जय प्रकाश (४६) यांना गोळ्या घालून ठार केल्याची माहिती पोलीस अधीक्षक देवेंद्र नाथ यांनी दिली. धीरेंद्र प्रताप सिंह हा भाजपच्या माजी सैनिक सेलचा पदाधिकारी असल्याची पुष्टी आमदार सुरेंद्र सिंह यांनी दिली आहे.
ते म्हणाले, की अशी घटना कुठेही घडू शकते. या घटनेत दोन्ही बाजुंनी दगडफेक झाली होती. कायदा त्यांच्या नियमाप्रमाणे कार्यवाही करेल, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी १५ ते २० जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. यामध्ये गोळीबार झाल्यानंतर लोक धावत असल्याचे दिसते. दरम्यान, समाजवादी पक्षासह काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्यावरून भाजपवर टीका केली आहे.