नवी दिल्ली - दिल्लीच्या निजामुद्दीन येथे 'मरकझ तबलिगी जमात' कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या अनेकाना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे कोरोना विषाणू संकट वाढले आहे. भाजप नेते कपिल मिश्रा यांनी तबलीगी जमातमधील लोकांवर कोरोना पसरवल्याचा आरोप केला आहे.
तबलीगी जमाती बाबत भाजप नेत्याचा गंभिर आरोप, म्हणाला.... - corona
भाजप नेते कपिल मिश्रा यांनी तबलीगी जमातमधील लोकांवर कोरोना पसरवल्याचा आरोप केला आहे.
तबलीगी जमातमधील लोकांनी विलगिकरण कक्षातील कर्मचारी आणि डॉक्टरांवर थुंकणे सुरू केले आहे. जास्तीत जास्त लोकांना कोरोनाबाधित करणे आणि मारणे हाच त्यांचा उद्देश आहे. ते दहशतवादी आहेत आणि त्यांना दहशतवाद्यांसारखेच वागणूक द्यायला हवी', असे कपिल मिश्रा यांनी टि्वट केले आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यात सहभाग घेतलेल्या बांधवांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे आता सध्या या कार्यक्रामातील सहभागी लोकांचा शोध घेतला जात आहे.