नवी दिल्ली- दिल्लीतील भाजप मुख्यालय बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा फोन आज कंट्रोल रूममध्ये आला. या निनावी फोननंतर दिल्ली पोलिसांनी यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध लावण्यासाठी कसून चौकशी सुरू केली आहे. काही महिन्यांपूर्वीच भाजप मुख्यालय अद्ययावत करण्यात आले आहे.
दिल्लीतील भाजप मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, कर्नाटकातून आला निनावी फोन
दिल्लीतील भाजप मुख्यालय बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा फोन आज कंट्रोल रूममध्ये आला.चौकशीदरम्यान हा फोन कर्नाटकमधील म्हैसूर येथून आल्याचे समोर आले आहे.
दिल्लीतील भाजपा मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी
चौकशीदरम्यान हा फोन कर्नाटकमधील म्हैसूर येथून आल्याचे समोर आले आहे. मात्र, यामागे नेमका कोणाचा हात आहे आणि या धमकीमागचा नेमका उद्देश अद्याप समजू शकला नाही. दिल्ली पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत असून लवकरच या प्रकरणाचा तपास लागू शकतो.