महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हरियाणा विधानसभा : अपक्ष अन् बंडखोर आमदारांचा भाजपला पाठिंबा, सत्ता स्थापनेच्या निकट - हरियाणा विधानसभा

अपक्ष आणि बंडोखोर उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिल्याने हरियाणामध्ये भाजप सत्तेच्या निकट पोहचला आहे.

मनोहरलाल खट्टर

By

Published : Oct 25, 2019, 1:11 PM IST

Updated : Oct 25, 2019, 1:59 PM IST

चंदीगड- अपक्ष आणि बंडोखोर उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिल्याने हरियाणामध्ये भाजप सत्तेच्या निकट पोहचला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना बहुमत न मिळाल्याने राज्यामध्ये त्रिशंकू परस्थिती निर्माण झाली होती. सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, भाजपला अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा मिळत आहे.

कोणत्या अपक्ष उमेदवारांनी उघडपणे दिला भाजपला पाठिंबा ?

गोलान मतदार संघातील अपक्ष उमेदवार रनधीर गोलान यांचा भाजपला पाठिंबा. म्हणाले, मी ३० वर्षांपासून भाजपमध्ये, भाजप माझ्या आईसारखी

पृथाला मतदार संघातून निवडून आलेले उमेदवार नयन पाल रावत यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.

रनिया मतदार संघातून निवडणून आलेले रणजित सिंह यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे.

दादरी मतदार संघातून विजयी उमेदवार सोमवीर सांगवान यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.

हरियाणा लोकहीत पक्षाचे नेते गोपाल कांडा यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. सर्व अपक्ष उमेदवारांचा भाजपला पाठिंबा आहे. माझे वडील जनसंघांशी १९२६ पासून जोडले गेले होते, असेही कांडा म्हणाले.

दिल्लीमध्ये जननायक जनता पक्षाच्या उमेदवारांची बैठक सुरू आहे. चार वाजता जेजेपी पक्षप्रमुख दुष्यंत चौटाला पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी कोणत्या पक्षाला जेजेपी पाठिंबा देणार याबाबत घोषणा होणार असल्याची शक्यता आहे.

Last Updated : Oct 25, 2019, 1:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details