महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राहुल गांधींविरोधात भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार; काय आहे प्रकरण? - Congress leader Rahul Gandhi

'इस बार न्याय रोजगार किसान मजदूर के लिए, आपका वोट हो सिर्फ महागठबंधन के लिए' असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल यांच्या या टि्वटवर आक्षेप घेत भाजपाने निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे.

राहुल गांधींविरोधात भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार; काय आहे प्रकरण?
राहुल गांधींविरोधात भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार; काय आहे प्रकरण?

By

Published : Oct 28, 2020, 4:02 PM IST

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राहुल यांच्या एका टि्वटचा दाखल देत हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल यांनी टि्वट करून मत मागण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करत भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

'इस बार न्याय रोजगार किसान मजदूर के लिए, आपका वोट हो सिर्फ महागठबंधन के लिए' असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल यांच्या या टि्वटवर आक्षेप घेत भाजपाने निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे.

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

बिहारमध्ये पहिल्या टप्प्पयातील मतदानाला आजपासून सुरूवात झाली आहे. 16 जिल्ह्यांमधील 71 जागांसाठी ही निवडणूक पार पडेल. यामध्ये 1 हजार 66 उमेदवारांचे नशीब मशीनबंद होणार आहे. तर 14 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानासाठी 31 हजार 371 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

कोणता पक्ष किती जागेवर लढवत आहे निवडणूक -

पहिल्या टप्प्यातील निवडणूकीत ७१ जागेसाठी मतदान होत आहे. यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष ३५ जागेवर निवडणूक लढवत आहे. तर नितीश यांचा सहकारी पक्ष भाजपाने २९ जागेवर आपले उमेदवार उतरवले आहेत. विरोधी पक्षाचे सांगायचे झाल्यास राजद ४२ तर काँग्रेस २० जागेवर लढत देत आहे. याशिवाय चिराग पासवान यांचा लोकशक्ती पक्षाने ४१ जागेवर आपले उमेदवार उतरवले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details