नवी दिल्ली - आर्टिकल 370 च्या मुद्द्यावरून बिहारच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. काँग्रेसकडून हा विषय पुढे आणला गेल्याने शनिवारी भाजपने काँग्रेसवर टीका केली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि दिग्विजय सिंह काश्मीरमधील आर्टिकल 370 रद्द करण्याचा निर्णय चुकीचा म्हणत आहेत, मग बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कॉंग्रेस याचा समावेश करेल काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
'आर्टिकल 370 रद्द करण्याचा निर्णय चुकीचा म्हणणाऱ्यांनी ते जाहीरनाम्यात घ्यावं'
काँग्रेसची ही भूमिका फुटीरतावादी आहे. काँग्रेसला ठाऊक आहे की, कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचे संपूर्ण देशाने स्वागत केले आहे. जे काही फुटीरतावादी आहेत त्यांच्यासाठी कॉंग्रेस मधूर स्वरात बोलत आहे.
काँग्रेसची ही भूमिका फुटीरतावादी आहे. काँग्रेसला ठाऊक आहे की, कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचे संपूर्ण देशाने स्वागत केले आहे. जे काही फुटीरतावादी आहेत त्यांच्यासाठी कॉंग्रेस मधूर स्वरात बोलत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी वारंवार पाकिस्तानचे कौतुक करतात, त्यांना कोणत्याही विषयावर पाकिस्तानचे कौतुक करणे, चीनची प्रशंसा करणे आवडते असे म्हणत प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधींवरही टीका केली.
जम्मू-काश्मीरमधील लोकांचा दर्जा आणि त्यांचे हक्क पुन्हा मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्न करेल. 5 ऑगस्ट 2019 ला मोदी सरकारने घेतलेल्या अनियंत्रित आणि असंवैधानिक निर्णयाला मागे घ्यावा, असे शुक्रवारी कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले असून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली असून तुमचे असे म्हणणे असल्यास जाहीरनाम्यात हा मुद्दा घेणार का असा प्रश्न केला.