महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'त्या' टि्वटमुळे कपिल मिश्रा यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

भाजपचे नेता कपिल मिश्रा यांच्या टि्वटवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. संबधित टि्वटमुळे निवडणूक आयोगाने कपिल यांना नोटीस पाठवली आहे.

कपिल मिश्रा
कपिल मिश्रा

By

Published : Jan 24, 2020, 4:16 PM IST

Updated : Jan 24, 2020, 7:12 PM IST

नवी दिल्ली - भाजपचे नेते कपिल मिश्रा यांच्या टि्वटवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. कपिल मिश्रा यांनी '8 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये पाकिस्तान आणि हिंदुस्तानमध्ये सामना होणार आहे', असे टि्वट केले होते. संबधित टि्वटमुळे निवडणूक आयोगाने कपिल यांना नोटीस पाठवली आहे. त्यावर 'मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे', असे कपिल मिश्रा म्हणाले.

'त्या' टि्वटमुळे कपिल मिश्रा यांना निवडणूक आयोगाने पाठवले नोटीस


गुरुवारी निवडणूक आयोगाकडून मला नोटीस प्राप्त झाली आहे. देशामध्ये सत्य बोलणे हा गुन्हा नसून, मी जे काही बोललो ते सत्य आहे. शाहीन बागमध्ये एका गटाने ताबा मिळवला आहे. तसेच त्यांना राजकीय पक्ष पाठिंबा देत आहेत, असे कपिल मिश्रा म्हणाले.


'तुम्ही लहान-लहान पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न केला तर एक मोठा हिंदुस्तान त्याला उत्तर देईल. शाहीन बागमध्ये महिलांना 500-500 रुपये देऊन आणले गेले आहे, असे मला वाटते. त्यांच्या आंदोलनामुळे रस्ते बंद झाले आहेत, असेही कपिल मिश्रा म्हणाले.


8 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये पाकिस्तान आणि हिंदुस्तानमध्ये सामना होणार आहे, असे टि्वट कपिल यांनी केले होते. या टि्वटवरून निवडणूक आयोगाने कपिल मिश्रा यांना नोटीस पाठवले आहे. तसेच निवडणूक आयोगाने टि्वटरलाही संबधित टि्वट हटवण्यास सांगितले आहे.

टि्वटमुळे निवडणूक आयोगाने कपिल यांना नोटीस पाठवली...


नागरिकत्व सुधारणा कायदा, एनसीआर आणि एनपीआरविरोधात दिल्लीतील शाहीन बागमध्ये मुस्लीम महिला धरणे आंदोलन करत आहेत. शाहीन बागमध्ये गेल्या एक महिन्यापासून जास्त काळ सीएएच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एक मुख्य रस्ता बंद झाला आहे. दिल्ली हायकोर्टाने पोलिसांना हा रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले होतो, पण याबाबत अधिक प्रगती झाली नाही.

Last Updated : Jan 24, 2020, 7:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details