महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपची लोकसभेसाठी १८२ उमेदवारांची यादी जाहीर; वाराणसीतून मोदी, तर गांधीनगरमधून शाह लढणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तर गांधीनगर मधून अमित शाहंना उमेदवारी देण्यात आली आहे. गांधीनगरमधून यापूर्वी लालकृष्ण अडवाणी यांनी निवडणूक लढविली होती.

By

Published : Mar 21, 2019, 7:49 PM IST

Updated : Mar 21, 2019, 11:23 PM IST

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह बैठकीदरम्यान चर्चा करताना

नवी दिल्ली - लोकसभेसाठी भाजपने १८२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तर गांधीनगरमधून अमित शाह निवडणूक लढवणार आहेत. नागपूरमधून नितीन गडकरी पुन्हा निवडणूक लढवतील. राजनाथ सिंह लखनौमधून निवडणूक लढवणार आहेत.

अमेठीतून स्मृती इराणी, मथुरामधून हेमा मालिनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. साक्षी महाराजांना उन्नावमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आपल्याला तिकीट दिले नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वीच साक्षी महाराजांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर साक्षी महाराजांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भाजपने १४ विद्यमान खासदारांनाच तिकीट दिले असून केवळ २ जागांवरच नवीन उमेदवार देण्यात आले आहेत. यामध्ये लातूरमध्ये सुधाकर राव शिंगारे आणि अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुख्य उमेदवार -

  • वाराणसी - नरेंद्र मोदी
  • गांधीनगर- अमित शाह
  • लखनौ - राजनाथ सिंह
  • नागपूर- नितीन गडकरी
  • अमेठी- स्मृती ईराणी
  • मुजफ्फरनगर- संजीव बाल्यान
  • गाजियाबाद- व्ही.के.सिंह
  • गौतमबुद्ध नगर - महेश शर्मा
  • मथुरा - हेमा मालिनी
  • आग्रा - एसपी सिंह बघेल
  • उन्नाव - साक्षी महाराज
  • बागपत - सत्यपाल सिंह
  • अलीगड - सतीश गौतम
  • एटा - राजवीर सिंह
  • गाझीपूर - मनोज सिन्हा
  • हरदोई - जयप्रकाश रावत
  • मुरादाबाद - कुंवर सर्वेश सिंह
  • फतेहपूर सीक्री - राजकुमार चहल
  • बदायूं- संगमित्रा मौर्य
Last Updated : Mar 21, 2019, 11:23 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details