नवी दिल्ली - महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आज (२ ऑक्टोबर) आज देशभरामध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षाने देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १५० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी श्रद्धांजली वाहिली.
काँग्रेसने देशभरामध्ये पदयात्रांचे आयोजन केले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीमध्ये एका पदयात्रेचे नेतृत्त्व करणार आहेत. त्याबरोबरच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी लखनऊमध्ये पदयात्रेचे नेतृत्त्व करणार आहेत.