महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'आम्ही राजकारणापासून खूप लांब राहतो, फक्त सरकारच्या आदेशानुसार काम'

माजी लष्कर प्रमुख बिपीन रावत आज 'चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ'चा पदभार स्वीकारणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Chief of Defence Staff
बिपीन रावत

By

Published : Jan 1, 2020, 10:35 AM IST

Updated : Jan 1, 2020, 1:30 PM IST

नवी दिल्ली -माजी लष्कर प्रमुख बिपीन रावत आज 'चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ'चा पदभार स्वीकारणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी राजकारणापासून दूर राहत असल्याचे म्हटले. आम्ही फक्त सत्तेत असणाऱ्या सरकारचे आदेश पाळतो, असे रावत म्हणाले. मागील आठवड्यात रावत यांनी राजकीय वक्तव्य केले होते. त्यावरून देशभरात प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ

हेही वाचा -'पाकने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाही, तर भारताकडे 'स्ट्राईक' अधिकार'

सीएए आणि एनआरसी आंदोलनावरून बिपीन रावत यांनी मागील गुरुवारी वक्तव्य केले होते. विद्यार्थ्यांना चुकीच्या दिशेनं कोणीतरी मार्गदर्शन करत असल्याचे रावत म्हणाले होते, त्यावरून देशभरामध्ये प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र, आपण राजकारणापासून खूप दूर असल्याचे आज त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -मणिपूरमध्ये चार दहशतवादी ताब्यात..

तिन्ही दलांनी एकत्र काम केल्याने खूप मोठे काम होऊ शकते. सरसेनाध्यक्ष म्हणजेच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पदावरच्या व्यक्तीने तटस्थ राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. मागील खूप वर्षांपासून गुरखा बटालीयनमध्ये काम करत होतो. आता शिरावरचा भार हलका झाल्यासारखे वाटत आहे. खूप दिवसानंतर गुरखा बटालियनची टोपी काढून दुसरी टोपी घालायला मिळाली आहे, असे ते म्हणाले.

जम्मू काश्मीरमध्ये आजच दोन जवान दहशतवाद्यांच्या गोळीबारात हुतात्मा झाले. यावर बोलण्यास रावत यांनी नकार दिला. ज्या पदाची जबाबदारी दिली आहे, त्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे रावत म्हणाले.

Last Updated : Jan 1, 2020, 1:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details