गया - बिहारमधील गुरुवारी माओवाद्यांनी रस्त्याच्या निर्मितीसाठी वापरात असलेली ४ वाहने पेटवली. गया जिल्ह्यातील बारचाट्टीमध्ये ही घटना घडली. महाराष्ट्रात सी - ६० पोलीस पथकाच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा हल्ला घडवून आणण्यात आला. गडचिरोलीत बुधवारी झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात १५ पोलिसांसह वाहनचालकाला प्राण गमवावे लागले होते.
बिहारमध्ये माओवाद्यांचा धुडगूस, रस्ते निर्मितीच्या वापरातील ४ वाहने पेटवली
महाराष्ट्रात क्विक रिअॅक्शन टीमच्या (QTR) पोलिसांना घेऊन जाणाऱ्या खासगी वाहनाला लक्ष्य करण्यात आले होते. या पोलिसांना गडचिरोली येथील कुरकेडा पोलीस ठाण्यापासून उत्तर गडचिरोलीतील बुराडा येथे घेऊन जाण्यात येत होते.
बिहारमध्ये माओवाद्यांचा धुडगूस