महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहार : उष्णतेच्या तीव्र लाटेचे औरंगाबादेत २५, गयामध्ये १७ बळी; मेंदूज्वराने ९३ जणांचा मृत्यू - patna

'उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकजण वेगवेगळ्या रुग्णांलयामध्ये उपचार घेत आहेत,' असे डॉ. सिंग यांनी सांगितले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच, त्यांना ४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली.

आरोग्य मंत्री हर्षवर्धन

By

Published : Jun 16, 2019, 8:17 PM IST

पाटणा - बिहारमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे आतापर्यंत ३७ लोकांनी जीव गमावले आहेत. याशिवाय, मुझफ्फरपूर जिल्ह्यात अॅक्युट एन्सेफॅलिटिस सिंड्रोम (एईएस) या मेंदूज्वराने आतापर्यंत ९३ जणांचे बळी घेतले आहेत.

उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे गेलेल्या बळींची संख्या औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नोंदवण्यात आले. येथे आतापर्यंत २५ जणांनी जीव गमावला आहे. औरंगाबाद येथील सिव्हिल सर्जन डॉ. सुरेंद्र प्रसाद सिंग यांनी ही माहिती दिली. तसेच, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, गया आणि नवाडा येथेही तीव्र उष्णतेमुळे झालेल्या मृत्यूंची नोंद झाली आहे. गया येथे १७ जणांना जीव गमवावा लागला आहे.

'उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकजण वेगवेगळ्या रुग्णांलयामध्ये उपचार घेत आहेत. मृतांपैकी सर्वजण तीव्र तापाने फणफणले होते,' असे डॉ. सिंग यांनी सांगितले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच, त्यांना ४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. त्यांनी जिल्हा मॅजिस्ट्रेटना उष्णतेच्या तीव्र लहरीशी सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

एईएस विषाणूजन्य ताप आणि उष्णतेच्या तीव्र लहरीच्या बळींच्या पार्श्वभूमीवर रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी पाटणाला भेट दिली. त्यांनी गया येथे झालेले मृत्यू दुर्दैवी असल्याचे म्हटले. तसेच, लोकांनी तीव्र उन्हात ऑफिस किंवा घराबाहेर पडू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यांनी आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांची भेट घेतली. तसेच, त्यांनी चौबे यांच्यासह रुग्णांचीही भेट घेतली.

हवामान खात्याच्या अहवालानुसार, बिहारमध्ये विविध ठिकाणी सामान्य तापमानाहून ५.१ अंश सेल्सियस अधिक तापमान नोंद करण्यात आले आहे. रविवारी गयामध्ये ४५.२, पाटणामध्ये ४५.८ अंश सेल्सियस तापमान होते. येथे राज्यातील सर्वाधिक उष्णता नोंद करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details