महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'त्या' सैनिकाच्या कुटुंबीयांना २५ लाखांची भरपाई देण्याची बिहार सरकारची घोषणा - kupwara encounter

सीआरपीएफ जवान पिंटू यांच्या कुटुंबीयांना यापूर्वीच ११ लाख रुपये दिले आहेत. मात्र, राजकीय वातावरण तापल्यानंतर आता पुन्हा २५ लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली.

नीतीश कुमार

By

Published : Mar 4, 2019, 10:03 AM IST

पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी रविवारी सीआरपीएफ जवान पिंटू कुमार सिंह यांच्या जवळच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांनी २५ लाखांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी आणि सीआरपीएफ जवानांदरम्यान चकमकीत शुक्रवारी पिंटू गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.

रविवारी पंतप्रधान मोदी बिहारच्या दौऱ्यावर होते. त्याच वेळी पिंटू यांच्यावर बिहारमध्येच त्यांच्या घरी अंत्यसंस्कार करण्यात येत होते. बिहारमधील त्यांचे कार्यकर्ते आणि नेते सर्वांनी त्यांच्या सभेला हजेरी लावल्याने पिंटू यांच्या अंत्यसंस्कारवेळी कोणताच भाजप किंवा राज्यातील सत्ताधारी पक्षाचा नेता उपस्थित नव्हता. यामुळे मोदी, भाजप आणि नीतीश कुमार सरकारवर विरोधी पक्षांनी कडाडून टीका केली होती. 'मोदी सभेला संबोधित करत होते. त्यांनी एअर स्ट्राईकचे पुरावे मागतात म्हणून विरोधी पक्षांना धारेवर धरले होते. सैनिकांचे बलिदान आणि देशप्रेम यांवर भाषण देत होते. मात्र, वीरमरण आलेल्या जवानाचे त्यांना स्मरण राहिले नाही,' अशा शब्दांत विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे देशप्रेमाचा हा डाव त्यांच्यावरच उलटण्याची स्थिती निर्माण झाली होती. जवानाच्या अंत्यसंस्कारावेळी एनडीएचा कोणताही नेता उपस्थित नसल्याने बिहारमधील राजकीय वातावरण तापले होते.

सीआरपीएफ जवान पिंटू यांच्या कुटुंबीयांना यापूर्वीच ११ लाख रुपये दिले आहेत. मात्र, राजकीय वातावरण तापल्यानंतर आता पुन्हा २५ लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. 'सत्ताधारी पक्ष सैनिकापेक्षा प्रचार यात्रेला महत्त्व देतात. ही देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे,' असा मुद्दा उपस्थित करणाऱ्या विरोधकांच्या टीकेतील हवा काढून घेण्यासाठी एनडीएने हा निर्णय घेतला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details