महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 1, 2019, 2:41 PM IST

ETV Bharat / bharat

चमकी रोगावर नितीश कुमारांनी चुप्पी तोडली, म्हणाले....

आम्ही चमकी (acute encephalitis syndrome) ची कारणे शोधण्यासाठी अमेरिकेपर्यंत संपर्क साधला. परंतु, त्यांच्या अहवालात आणि येथील अहवालात काही गोष्टींत तफावत जाणवली.

नितीश कुमार

पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 'चमकी'वरून पहिल्यांदाच चुप्पी तोडली आहे. चमकीमुळे झालेल्या घटनांबद्दल मला दुख: आहे. परंतु, आमचा उद्देश फक्त दुख: जाहीर करणे नाही तर, यावर उपाययोजना तयार करण्याचाही आहे, असे मुख्यमंत्री नितीशुकमार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, की आम्ही चमकी (acute encephalitis syndrome) ची कारणे शोधण्यासाठी अमेरिकेपर्यंत संपर्क साधला. परंतु, त्यांच्या अहवालात आणि येथील अहवालात काही गोष्टींत तफावत जाणवली. २०१५ साली पाटणा येथे सरकारची याच मुद्यावर बैठक झाली होती. बैठकीत अनेक तज्ञ उपस्थित होते. तज्ञांनी आपली मते मांडली. परंतु, सर्वांच्या स्पष्टीकरण्यात साम्य नव्हते. यानंतर, आम्ही अमेरिकेच्या तज्ञांकडेही याबाबत चौकशी केली होती.

विधानसभेत याआधी आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांनी चमकी रोगाने झालेली मृत्यूंची संख्येचा अहवाल दिला होता. २८ जूनपर्यंत एकूण ७२० मुलांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. यातील ५८६ मुले बरी झाली होती. तर, १५३ मुलांचा मृत्यू झाला होता. २०११ ते २०१९ पर्यंतच्या आकड्यांपेक्षा ही आकडेवारी कमी आहे, असे त्यांनी सांगितले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details