महाराष्ट्र

maharashtra

ट्विट प्रकरण : बिलासपूर उच्च न्यायालयातून संबित पात्राला दिलासा, पुढील आदेश येईपर्यंत अटक नाही

By

Published : Jun 11, 2020, 6:50 PM IST

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांच्यावर भाष्य केल्याबद्दल संबित पात्राविरोधात रायपूरच्या सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी, बिलासपूर उच्च न्यायालयाने पात्राच्या अटकेला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने अटकेच्या प्रकरणात सरकारकडे जाब विचारला आहे.

संबित पात्रा
संबित पात्रा

बिलासपूर - भाजप नेते संबित पात्रा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांच्याविरूद्ध बदनामीकारक टिप्पणी केली होती. या प्रकरणात युवा कॉंग्रेसने रायपूर आणि भिलाई येथे पात्राविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. तसेच, अटकेची मागणीही करण्यात आली होती. परंतु, बिलासपूर उच्च न्यायालयाने संबित पात्राच्या अटकेला स्थगिती दिली आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी 10 मे रोजी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तसेच राजीव गांधी यांच्यावर ट्विटरवरून टिप्पणी केली होते. या प्रकरणी छत्तीसगडमध्ये युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष पूर्णचंद कोको पाधी यांनी पात्रा यांच्याविरोधात रायपूरच्या सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सिव्हिल लाइन पोलिसांनी संबंधित पात्राला चौकशीसाठी नोटीस बजावली होती, परंतु तब्येत बिघडल्याचे कारण पुढे करत पात्रा चौकशीसाठी अनुपस्थित राहिले.

या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी अनेकदा संबित पात्राला हजर राहण्याकरता नोटीस देऊन समन्स बजावला. मात्र, पात्रा अनुपस्थित राहिले. अखेर पात्राच्या अटकेवर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती संजय के. अग्रवाल यांच्या खंडपीठाने केली.

याबाबत तक्रारदार कोको पाधी म्हणाले, संबित पात्राकडे अशा प्रकारची टिप्पणी करण्यासाठी कोणतेही पुरावे नसून त्यांचा आरोप पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे. असे निराधार आरोप करून संबंधित पात्राने जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले असल्याचे पाधी म्हणाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार10 मे रोजी संबित पात्रा यांनी टि्वट करत पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी, या दोन माजी पंतप्रधानांवर काश्मीर प्रश्न, 1984 च्या शीखविरोधी दंगली आणि बोफोर्स घोटाळ्याचा खोटा आरोप केला होता. याबाबत पाधी यांनी पात्रा यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली होती.

गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी कारवाईची मागणी केली

या प्रकरणावर छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनीही पात्रावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे आणि बोलण्यात संयम ठेवला पाहिजे. त्यांच्याच पक्षाच्या नेत्याला सर्वोपरि मानले जाऊ नये, असे ते म्हणाले. तर, संबित पात्रा यांनी केलेली टिप्पणी ही आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details