पणजी - गेल्या वर्षी मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंतर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देणे ही माझ्या राजकीय कारकिर्दीमधील सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे आज गोव्याच्या जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी मी गोव्यातील जनतेची माफी मागतो. तसेच भाजपप्रणित राज्य सरकार हे असक्षम आणि बेजबाबदार असल्याचा आरोप गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई म्हणाले. दक्षिण गोवा जिल्ह्यातील फातोर्डा मतदारसंघात जनतेला संबोधित करताना ते बोलत होते.
पुढील काळात असे सरकार स्थापन करण्यासाठी मदत करणार नाही. पर्रीकर यांच्या मृत्यनंतरच आमच्यासाठी भाजप संपले होते. आम्ही भविष्यात गोव्यामध्ये भाजपला कधीही सरकार स्थापन करू देणार नाही, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच भविष्यात गोवा फॉरवर्ड पक्ष सरकारला चांगले कायदे करण्यासाठी मदत करणार असल्याचेही ते म्हणाले.