महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अमेरिकेतील सुमारे २० लाख हिंदू मतांसाठी ट्रम्प-बिडेन यांच्यात रस्सीखेच - हिंदु अमेरिकन फॉर बिडेन

इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेतील दोन्ही मोठे पक्ष हिंदु मते मिळविण्यासाठी लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात हिंदु मतांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे यातून दिसून येत आहे. अमेरिकेत हिंदु हा चौथा मोठा धर्म म्हणून पुढे आला आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 2, 2020, 3:32 PM IST

वॉशिग्टंन डी. सी -अमेरिकेमध्ये ३ नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी प्रचार मोहिम जोरदार सुरू केली आहे. २०१६ च्या आकडेवारीनुसार अमेरिकेत एकूण लोकसंख्येच्या १ टक्के म्हणजे २० लाखांपेक्षा जास्त हिंदु आहेत. त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ट्रम्प आणि बिडेन दोघांनीही रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतील हिंदुच्या अडचणींवर दोन्ही पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यात मुख्य मुद्दा हिंदुवरील हल्ल्यांचा आणि एच१ बी व्हिसा राहणार आहे.

'हिंदु अमेरिकन फॉर बिडेन' असे अभियान डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बिडेन आणि उपाध्यक्ष पदाच्या इंडियन- अमेरिकन उमेदवार कमला हॅरिस यांनी सुरु केले आहे. गुरुवारी ईलिऑन्स शहरातील इंडियन-अमेरिकन वंशाचे नेते राजा कृष्णमूर्ती पहिली सभा घेणार आहेत. हिंदुंना आकर्षित करण्याचा प्रयत्न या बैठकीत करण्यात येईल. मुख्यता पूर्वग्रहातून आणि द्वेषातून इतर देशांच्या नागरिकांवर होणारे हल्ल्यांवर या सभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.

१४ ऑगस्ट रोजी 'हिंदु व्हॉईस फॉर ट्रम्प' हे अभियान डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सुरू केल्यानंतर पंधरा दिवसांनतरच बिडेन यांनीही हिंदुंना प्रभावित करण्यासाठी अभियान सुरू केले आहे. ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत जो बिडेन आणि कमला हॅरिस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माईक पेन्स यांना सामना करणार आहेत.

इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेतील दोन्ही मोठे पक्ष हिंदु मते मिळविण्यासाठी लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात हिंदु मतांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे यातून दिसून येत आहे. अमेरिकेत हिंदु हा चौथा मोठा धर्म म्हणून पुढे आला आहे. या आधीच्या निवडणुकांत ज्यू आणि मुस्लिम मते मिळविण्यासाठीही राजकीय पक्षांनी अभियाने राबविली होती. मात्र, आता हिंदु मतेही निवडणुकीत मोठा प्रभाव पाडू शकतात, म्हणून राजकीय पक्षांकडे त्याचे लक्ष्य केले आहे.

'अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा फेडरल ब्युरो ऑफ इंन्टेलिजन्स(FBI) नुसार, डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर अमेरिकेत तिरस्कारातून द्वेषातून होणाऱ्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असा दावा AAPI लिडरशिप कौन्सिलचे अजय भुतोरिया यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणामुळे हिंदु मते त्यांच्या विरोधात जाऊ शकतात, अशी परिस्थिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details