लखनौ - लोकसभा निवडणुकांना केवळ २ आठवडे शिल्लक आहेत. त्याबरोबरच निवडणुकांचा रोमांच वाढत चालला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात कोण उभे असणार याची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, भीम आर्मीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आझाद यांनी मोदींच्या विरोधात निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर एकतर्फी होणारी लढत आता 'कांटे की टक्कर'मध्ये परिवर्तीत झाली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांचे लक्ष उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदार संघावर लागलेले आहे. पंतप्रधान मोदी या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत. या मतदार संघातून त्यांना सहसा मोठे चॅलेंज मिळणार नाही, असे म्हटले जात होते. त्यामुळे ही लढत एकतर्फी होणार, असे सर्वांना वाटत होते. मात्र, आता या ठिकाणावरून भीम आर्मी चिफ चंद्रशेखर आझाद लढणार आहेत.