हैदराबाद - पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार ७५८ कोटींचे कर्ज बुडवणाऱ्या नीरव मोदीला लंडन येथे अटक झाली. मात्र, त्याने अटकेपासून वाचण्यासाठी मोठी शक्कल लढवली होती. लपण्यासाठी त्याने देशभरातील अनेक देश पालथे घातले. एवढेच नाही तर त्याने आपला वेष बदलण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु, हे सर्व करूनही अटकेपासून वाचण्यास तो अपयशी ठरला.
हिरे व्यापारी निरव मोदी १५ महिन्याआधी भारतातून फरार झाला होता. त्याने भारतीय तपास यंत्रणेपासून वाचण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्याने वॅनुआटू या देशाचे नागरिकत्व घेण्याचा प्रयत्न केला होता. वॅनुआटू हा ऑस्ट्रेलिया खंडातील छोटा देश आहे. सिंगापूर येथेही स्थाही नागरिकत्व मिळवण्यासाठी त्याने निवेदन केले होते. त्यासाठी त्याने ब्रिटनमधील मोठ-मोठ्या कायदे तज्ज्ञांची मदत घेतली होती. एवढेच नाही तर आपली वेषभूशा बदण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करण्याचेही त्याने ठरवले होते. मात्र, एवढे करूनही त्याला लंडन येथून अटक झाली.