महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अभिनेत्री मिमी चक्रवर्तीची संसदेत उपस्थिती; 'या' भाषेत घेतली सदस्यत्वाची शपथ - जादवपूर

निवडुन आल्यानंतर पहिल्यांदाच हजर राहिलेल्या मिमी चक्रवर्ती बंगाली भाषेत शपथ घेत लोकसभेच्या सदस्य बनल्या.

अभिनेत्री मिमी चक्रवर्ती

By

Published : Jun 25, 2019, 2:49 PM IST

Updated : Jun 25, 2019, 3:06 PM IST

नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांनी आज संसदेत हजेरी लावली. निवडुन आल्यानंतर पहिल्यांदाच हजर राहिलेल्या मिमी चक्रवर्ती यांनी बंगाली भाषेत शपथ घेत लोकसभेच्या सदस्य बनल्या.

मिमी चक्रवर्ती यांनी जादवपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली होती. यानंतर, मिमी पहिल्यांदाच आज लोकसभेत उपस्थित राहिली. मिमीने यावेळी पाढऱ्या रंगाचा सुट घातला होता. मिमी ही बंगाली अभिनेत्री असून तिने चॅम्पियन या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेतही भागात घेतला होता. यानंतर, मिमीने छोट्या पडद्यावरील 'गाणेर ओपारे' या संगीताच्या कार्यक्रमात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

Last Updated : Jun 25, 2019, 3:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details