मुंबई- बंगाली अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार तपस पॉल यांचे मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांनी याबाबत माहिती दिली. ते ६१ वर्षांचे होते.
पॉल हे त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी मुंबईला आले होते. कोलकात्याला परत जात असताना मुंबईच्या विमानतळावरच अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना तत्काळ जूहू येथे रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ते हृदयविकाराने त्रस्त होते. गेल्या दोन वर्षात अनेकदा त्यांनी उपचार घेतले होते.