कोलकाता -देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे. आपला जीव धोक्यात घालून कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सात दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारने घेतला आहे. सलग आठवडाभर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सात दिवस आराम देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत घोषणा केली. राज्याचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी आरोग्य मंत्रालयाला आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाच्या कार्य प्रणालीत फेरबदल करण्यात येतील.