महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तुम्ही घरी थांबाल तरच कोरोना हरेल, पाच वर्षाच्या चिमुकलीचा संदेश

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन तसेच जमावबंदी जाहीर केली गेली आहे. मात्र, तरीही अनेक लोक बेजबाबदारपणे रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत.अशात जयपूरमधील एका साडेपाच वर्षाच्या मुलीने लोकांना एक अतिशय महत्तवपूर्ण संदेश दिला आहे.

पाच वर्षाच्या चिमुकलीचा संदेश
पाच वर्षाच्या चिमुकलीचा संदेश

By

Published : Apr 3, 2020, 11:34 AM IST

जयपूर- कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन तसेच जमावबंदी जाहीर केली गेली आहे. मात्र, तरीही अनेक लोक बेजबाबदारपणे रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. असे लोक स्वतः सोबतच इतरांचा जीवही धोक्यात टाकत आहेत. अशात जयपूरमधील एका साडेपाच वर्षाच्या मुलीने लोकांना एक अतिशय महत्तवपूर्ण संदेश दिला आहे.

देवांशीने म्हटले आहे, की लोकांनी विनाकारण आपल्या घराबाहेर जाऊ नये. बाहेर कोरोना आहे आणि जर तुम्ही बाहेर फिरत राहिलात तर तो कधीच माघारी जाणार नाही. यासोबतच तिने लोकांना मास्क, सॅनिटायझर आणि साबणाचा वापर करण्याचेही आवाहन केले आहे.

पाच वर्षाच्या चिमुकलीचा संदेश

अशाप्रकारे ५ वर्षाच्या देवांशीने आपल्या संदेशातून लोकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. देवांशी जयपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या इंस्पेक्टर इंद्रराज मरोडिया आणि इंस्पेक्टर निर्मला मरोडिया यांची मुलगी आहे. घरात राहण्यासोबतच तिने लोकांना पौष्टिक अन्न खाण्याचाही सल्ला दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details