महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना: राजस्थानची लेक अमेरिकेतील गरजूंना पुरवतेय मोफत अन्न

गरजूंना शक्य तेवढी मदत करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. जोपर्यंत कोरोना महामारीचे संकट संपत नाही, तोपर्यंत आम्ही गरजूंना मदत करत राहू.

सुमित्रा भूरट
सुमित्रा भूरट

By

Published : Apr 30, 2020, 1:52 PM IST

जयपूर - मुळची राजस्थान राज्यातील बाडमेर, सिवाना येथील असलेली महिला अमेरिकेत गरजूंचे पोट भरण्याचे काम करत आहे. अमेरिकेतील मिशनग राज्यामधल्या अर्बोर शहरामध्ये सुमित्रा भूरट आपल्या पतीसह राहतात.

राजस्थानची लेक अमेरिकेतील गरजूंना पुरवतेय मोफत अन्न

अमेरिकेमध्ये त्या हटके फ्यूजन नावाचे हॉटेल चालवतात. कोरोनामुळे सर्व हॉटेल आणि फास्ट फूड स्टॉल बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे जेवणाचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत सुमित्रा यांनी गरजूंना फूड पॅकेट देण्यास सुरुवात केली आहे.

गरजूंना शक्य तेवढी मदत करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. जोपर्यंत कोरोना महामारीचे संकट संपत नाही, तोपर्यंत आम्ही गरजूंना मदत करत राहू. आरोग्य कर्मचारी आणि छोट्या व्यवसाईकांनाही आम्ही मदत करत आहोत. सुरक्षित राहा आणि गरजूंवर द्या दाखवा, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे.

अमेरिकेमध्ये कोरोनाचा १० लाखांपेक्षा जास्त नागरिकांना संसर्ग झाला आहे. तर ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details