नवी दिल्ली -ऑक्टोबर महिन्यामध्ये बँक तब्बल ११ दिवस बंद राहणार आहेत. पुढील महिन्यात अनेक महत्वाचे सण लागोपाठ आल्याने सुट्ट्यामुळे बँका बंद राहणार आहेत. बँक २,६,७,८, १२,१३,२०,२६,२७,२८,२९, या दिवशी बंद राहणार आहेत.
बँकाना तब्बल अकरा दिवस सरकारी सुट्ट्या, वेळेत उरकून घ्या कामे - बँकाना तब्बल अकरा दिवस सरकारी सुट्ट्या
ऑक्टोबर महिन्यामध्ये बँक तब्बल ११ दिवस बंद राहणार आहेत.
येत्या 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आहे. त्यामुळे बँक बंद राहील. त्यानंतर 6 ऑक्टोबर रविवार, 7 ऑक्टोबरला रामनवमी, 8 ऑक्टोबरला दसरा आहे. त्यामुळे सलग तीन दिवस बँकाना सुट्टी राहील. त्यानंतर 12 ऑक्टोबरला महिण्याचा दुसरा शनिवार आहे. तर १३ आणि २० ऑक्टोबरला रविवार असल्याने बँक बंद राहणार आहे. याचबरोबर 26 ऑक्टोबरला चौथा शनिवार तर 27 ला रविवार असल्यामुळे तर 28 ऑक्टोबरला दिवाळी पाडवा आणि 29 ऑक्टोबरला भाऊबीज आहे. त्यामुळे बँकाना सुट्ट्या असणार आहेत.
बँकांना सुट्ट्या असल्यामुळे सणांच्या वेळी एटीएमध्ये पैशाची कमतरता भासणार नाही, याचे नियोजन नागरिकांनी करावे.